राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला आता ३० सष्टेंबर पर्यंत मिळाली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकाना मोठा दिलासा मिळाला आहे. ( has been extended till September 30)
मुंबईसह राज्यात करोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्याची करोना स्थिती लक्षात घेता प्रवास सवलतीसाठी आवश्यक असलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे, असे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी मंगळवारी रात्री जाहीर केले. या पूर्वी या योजनेत नोंदणी आणि कार्ड वितरणासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.
एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने, सदर योजनेला पुढील सहा महिने, म्हणजेच ३० सष्टेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री,परब यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times