डॉक्युमेन्ट्री फीचर कॅटेगरीमध्ये अमेरिकन फॅक्ट्रीला मिळाला ऑस्कर
ब्रॅड पिट- ‘मी भाषण देताना नेहमीच अस्वस्थ होतो. अशावेळी मला काय बोलावं सुचत नाही. यावेळी मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला. जास्तीज जास्त सहजता आणण्याचा प्रयत्न केला. हे सर्व त्याचंच उत्तर आहे.’
लिटिल वूमन सिनेमासाठी बेस्ट कॉस्च्युम डिझाइन ऑस्करची मानकरी ठरली जॅकलीन दुरान
वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूडला अजून एक पुरस्कार, प्रोडक्शन डिझाइनमध्येही जिंकला ऑस्कर
इडिना मेनजेलचा मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स
लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म- द नेबर्स विंडेने जिंकला ऑस्कर
जेव्हा हेअर लव्हसाठी ऑस्करची घोषणा झाली
अॅडॅप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर जोजो रॅबीट सिनेमाला मिळाला
ओरिजनल स्क्रीनप्लेचा ऑस्कर पॅरासाइट सिनेमाला मिळाला
पाहा ऑस्कर ट्रॉफी घेतानाचं ब्रॅड पीटचं भावुक भाषण
पुरस्कार मिळाल्यानंतर ब्रॅड पीटने बॅकस्टेज असा केला जल्लोष
ब्रॅड पीटला मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार
अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म कॅटिगरीमध्ये ‘हेयर लव’ ने जिंकला ऑस्कर
तुम्हालाही होईल आनंद
टॉय स्टोरी ४ ला बेस्ट एनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार जाहीर
रेड कार्पेटवर सेलिब्रिटींची मांदियाळी
देसी गर्ल ऑस्करला मुकली
प्रियांका चोप्राने ट्वीट करून तिच्या चाहत्यांना कल्पना दिली की, ती यावर्षी ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहणार नाही.
यावर्षी कोणता सिनेमा सर्वोत्कृष्ट असावा हे सांगणं कठीण आहे. अनेक सिनेमांनी जगभरात अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं अशात अकादमी पुरस्कारांच्या टीमला सिनेमा निवडताना अडचणी येणार यात काही शंका नाही. जोआक्विन फिनिक्स स्टारर ‘जोकर’ पासून मार्टिन स्करसेसीज स्टारर ‘द आयरिशमॅन’ आणि क्वेंटिन टेरिंटनोचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ सिनेमापर्यंत अनेक नावाजलेले सिनेमे आहेत जे ऑस्करच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
‘जोकर’ सिनेमाचं वर्चस्व
सध्या या सिनेमाला ११ नामांकन मिळाली असून नामांकनाच्या यादीत हा सिनेमा पुढे आहे. यानंतर ‘1917’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ आणि ‘द आयरिशमॅन’ या सिनेमांना प्रत्येकी १० नामांकनं मिळाली आहेत. याशिवाय ‘फोर्ड वी फेरारी’, ‘जोजो रॅबिट’, ‘लिटिल वुमिन’, ‘मॅरेज स्टोरी’ आणि ‘पॅरासाइट’ या सिनेमांचा समावेशही आहे.
ऑस्करमध्ये बदल
यावर्षी ऑस्करमध्ये जो बदल करण्यात आला आहे तो फॉरेन लॅग्वेज कॅटेगरीमध्ये करण्यात आला आहे. यावेळी या कॅटेगरीला बेस्ट इण्टरनॅशनल फीचर फिल्म असं नाव देण्यात आलं आहे. कोरियन फिल्म पॅरासाइटला याच श्रेणीत नामांकन मिळालं आहे. बोंग जून- हो यांनी पॅरासाइट सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
भारतात ऑस्कर
भारतात ऑस्कर पुरस्कार सोहळा १० फेब्रुवारीला सकाळी ६.३० वाजता सुरू होईल. रेड कार्पेटच्या लाइव्ह कव्हरेजचं स्ट्रीमिंग @TheAcademy या ट्विटर अकाउंटवर सकाळी ५.०० वाजल्यापासून होईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times