मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीत स्फोटके ठेवण्यापासून ते त्या गाडीचे मालक असलेले मनसुख हिरेन यांचा मृत्यू, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ‘एनआयए’ने आतापर्यंत पाच आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. त्यामध्ये मर्सिडीजसह प्राडो या गाडीचाही समावेश आहे. त्यानंतर ‘एनआयए’ने मंगळवारी मित्सुबिशी आऊटलँडर ही आणखी एक आलिशान गाडी जप्त केली. ही गाडी वाझे यांच्याच नावावर आहे.
दरम्यान, रविवारी मिठी नदीतून बाहेर काढलेल्या सामानाचाही ‘एनआयए’ने आता विस्तृत तपास सुरू केला आहे. वाझे यांनी मिठी नदीत फेकलेला लॅपटॉप ‘डीकोड’ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा लॅपटॉप वाझे हे ‘सीआययू’ कार्यालयातील कामासाठी वापरत होते, असे समोर आले आहे. त्यानुसार या लॅपटॉपमध्ये नेमकी काय माहिती आहे व त्याचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे, त्यात आणखी कोणी सहभागी आहे का, यासाठी आता लॅपटॉपमधील माहिती महत्त्वाची ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times