मुंबईः शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं भूमिपूजन आज संपन्न झालं आहे. शिवसेनेच्या विराट सभांनी गाजलेल्या शिवाजी पार्क मैदानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी बाळासाहेबांचं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक होत आहे. या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह हा सोहळा होणार असून त्याचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांच्या हस्ते स्मारकाच्या आवारातच वृक्षारोपण केलं गेलं. तसंच, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.

स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यातील आमंत्रितांच्या यादीवरून राजकारण रंगलं आहे. आमंत्रितांच्या यादीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व व राज ठाकरे यांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत होतं. यावरुन इतर राजकीय पक्षांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here