सांगलीतील तालुक्यात डफळापूर जवळील येथे पाच वर्षांपूर्वी, १० सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे एकाच कुटुंबातील चार महिलांची हत्या करण्यात आली होती. आरोपीने त्याची पत्नी, दोन मुली आणि आईची हत्या केली होती. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाने पंचक्रोशी हादरली होती. या खटल्याचा सांगली जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निकाल दिला. चौघींची हत्या करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी आणि त्याची सावत्र आई यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. तो न्यायालयात सुरू होता. त्यामुळे इरकर आर्थिक अडचणीत सापडला होता. त्याने धारदार शस्त्राने आई, पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली होती.
काय घडलं होतं?
जत तालुक्यातील कुडनूर गावात १० सप्टेंबर २०१६ रोजी पहाटेच खळबळ उडवून देणारी घटना घडली. इरकर याने आपली पत्नी, आई आणि दोन मुलींची हत्या केली होती. धारदार शस्त्राने त्याने चौघींची हत्या केली. जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. त्याने या हत्येची कबुलीही दिली होती. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवले होते. चौघींच्या हत्येनंतर आरोपी इरकर याने पोलिसांसमोर या गुन्ह्याची कबुली दिली होती. इरकर याला आणखी दोन मुले आहेत. ती दोन्ही मुले ही आदल्या रात्री कुडनूर गावातच आपल्या आत्याच्या घरी अभ्यासाला गेली होती. ते तिथेच झोपले होते. त्यामुळे ते बचावले, अशी चर्चा गावात होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times