नागपूर: महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा आज मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ‘माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय…’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:

तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीचा आज मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली आहे. राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. यशोमती ठाकूर यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय. महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

वाचा

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही हिंगणघाटच्या पीडितेला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘दिवसाची सुरुवात या दुर्दैवी बातमीनं होतेय, याचं दु:ख वाटतं,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here