कोलकाता : च्या आज (गुरुवारी) पार पडतंय. या टप्प्यातील चर्चित मतदारसंघ म्हणजे नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ… या मतदारसंघातून स्वत: तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभेच्या रणांगणात आहेत… तर मुख्यमंत्र्यांना त्यांचे माजी सहकारी सुवेंदू अधिकारी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून आव्हान देत आहेत.

LIVE अपडेट

– पश्चिम बंगालमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१४ टक्के मतदान, तर आसाममध्ये १०.५१ टक्के मतदान

– पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये प्रचारसभा घेणार

– नंदीग्राममधील भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी केले मतदान… संपूर्ण देशाचे लक्ष नंदीग्रामवर आहे. यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं. नंदीग्रामला विकास हवा आहे की जातीयवादी राजकारण हे लोकांना बघायचं आहे, अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी मतदानानंततर दिली.

– पश्चिम बंगालसह आसाममध्येही दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे

– पश्चिम मिदनापूरमध्ये मतदानासाठी मतदारांची मोठी रांग

– हायप्रोफाइल नंदीग्राम मतदारसंघात मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा

– बांकुरामध्ये मतदान सुरू… मतदानासांठी मतदारांची रांग

– पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरवात

– पुढच्या काही मिनिटांत सुरू होणार मतदान

– १ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातही सकाळी ७.०० वाजता मतदानाला सुरुवात होतेय. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे

– पश्चिम बंगालच्या ३० जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे

– या टप्प्यात एकूण १७१ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. तर एकूण ७५ लाख ९४ हजार ५४९ मतदारांच्या हातात या उमेदवारांचं भविष्य आहे

– दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी तब्बल १०,६२० मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत

– सुरक्षेसाठी सीएपीएफच्या ६९७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील जिल्हे : पूर्व मेदिनीपूर, पश्चिम मेदिनीपूर, बांकुडा, दक्षिण २४ परगना

पूर्व मेदिनीपूर : ९ मतदारसंघ

तमलूक, पांशकुडा पूर्व, पांशकुडा पश्चिम, मोयना, नंदकुमार, महिषादल, हल्दिया, नंदीग्राम, चांदीपूर

पश्चिम मेदिनीपूर : ९ मतदारसंघ

खडगपूर सदर, नारायणगड, सबंग, पिंगला, देबरा, दासपूर, घाटाल, चंद्रकोणा, केशपूर

बांकुडा : ८ मतदारसंघ

तालडांगरा, बांकुडा, बरजोरा, ओंदा, विष्णुपूर, कतुलपूर, इंडास, सोनामुखी

दक्षिण २४ परगना : ४ मतदारसंघ

गोसाबा, पाथरप्रतिमा, काकद्वीप, सागर

मंगळवारी सायंकाळी दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मिथुन चक्रवर्ती, धर्मेंद्र प्रधान अशी मोठी फौज रोड शो करताना दिसली. दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांनीही नंदीग्राममध्ये अनेक निवडणूक रॅली घेतल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here