महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत असून रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशातच सिडकोतील कामटवाडे भागातील ३८ वर्षीय रुग्णानं बेड मिळत नसल्यानं थेट ऑक्सिजन सिलिंडरसह महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन केलं होतं. त्यामुळं महापालिका परिसरात खळबळ माजली होती.
या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण केवळ ३५ टक्के इतके असल्याचे बोटाला लावलेल्या ऑक्सिमीटवरुन दिसत होते. याठिकाणी गर्दी जमू लागल्यानंतर आयुक्त जाधव यांनी स्वत: अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांना पाठवले. त्यानंतर महापालिकेची रुग्णवाहिका बोलावून रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मध्यरात्री आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, करोनाबाधित रुग्णांना पालिका प्रवेशद्वारावर घेऊन येणाऱ्या व गोंधळ घातल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times