मुंबईः अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं काही तासांत मागे घेतला आहे. नजरचुकीने काढले गेलेले हे आदेश मागे घेण्यात येत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. निर्मला सीताराम यांच्या याच ट्वीटवरुन विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

भविष्य निर्वाह निधीसह अन्य अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीवरील व्याजाला कात्री लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. केंद्र सरकारनं अवघ्या काही तासांतच निर्णय बदलल्याने मोदी सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे.

काँग्रेसचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी निर्मला सीतारामन यांचं ट्वीट रिट्वीट करत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘नजरचूक वगैरे काही नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मागे घेण्यात आला असावा. परंतु, आज १ एप्रिल आहे हे एप्रिल फुल पण असू शकतं. निवडणूक संपल्यावर कदाचित आज मागे घेतलेला निर्णय पुन्हा लागू केला जाऊ शकतो,’ असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

तर, राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘वित्त मंत्रालयाच्या नजरचुकीचे अजिबात नवल वाटले नाही. पण वित्त मंत्रालय नेमक कोण चालवतय? आणि या मंत्रालयानं शेवटचा कोणता निर्णय विचारपूर्वक घेतला होता? नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी की करोना संदर्भातील आर्थिक पॅकेज?,’ असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here