राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी राज्यात ३९ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तसंच, राज्यात २ एप्रिलपासून पुन्हा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, राजेश टोपे यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. तर, राज्यात तुर्तास लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्यात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. तसंच, संसर्गाची संख्या वाढली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नसतो. अनेक देश अशी परिस्थीती आल्यास लॉकडाऊन करतात. पण जरी आपल्याला लॉकडाऊन करावा लागला तर कोणत्या क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो याबाबत चर्चा झाली. मात्र, २ एप्रिलला लॉकडाऊन करण्यात येणार नाही. पण निर्बंध कडक करण्यात येणार,’ असा इशारा राजेश टोपेंनी दिला आहे.
‘रुग्णांची संख्या ही संसर्गामुळं वाढतं. जर प्रत्येकजण घरी बसले तर संसर्गाची साखळी तुटते त्यालाच आपण लॉकडाऊन म्हणतो. पण लॉकडाऊनचा आर्थिक क्षेत्रावर परिणाम होतो. म्हणूनच लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवला आहे. तसंच, गर्दी टाळण्यासाठी कठोर निर्बंध करण्यात येण्यात आहेत. असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊनचा पर्याय ठेवावाच लागतो. गरज पडल्यास लॉकडाऊन लावाला लागेलचं,’ असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं आहे.
‘सध्या फक्त निर्बंध कठोर करण्यात येणार आहेत. पण लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. मात्र, चर्चाही लॉकडाऊनच्या दिशेनं आहे,’ असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times