गेल्या महिन्यापासून राज्यासह मुंबईतही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत रुग्णवाढीचा दर पाहिला तर तो सरासरी १.३४ टक्के इतका झाला आहे. मुंबईतील रुग्णवाढ लक्षात घेता महापालिकेने कंबर कसली आहे. शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांचे बेडही आता उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच महापालिकेने करोनाच्या चाचण्यादेखील वाढवल्या आहेत.
करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाइन किंवा संस्थात्मक क्वारंटाइन केले जात आहे. यांमध्ये लक्षणे नसलेल्या मात्र अतिजोखमीच्या गटातील संशयित रुग्णांना पोलिकेच्या संस्थात्मक क्वारंटाइन केद्रात ठेवण्यात येत आहे. असे असले तरी होम क्वारंटाइन हे धोकादायक ठरू लागल्याचे चित्र आहे.
एखाद्याच्या घरात स्वतंत्र खोली असेल, तसेच घरात प्रसाधनगृह असेल तरच अशा रुग्णांना होम क्वारंटाइनची परवानगी दिली जाते. ही परवानगी मिळाल्यानंतर अशा रुग्णांनी घरातील इतर सदस्यांच्या कोणत्याही स्वरुपात संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यायची असते. मात्र यांपैकी बहुतेक रुग्ण अशी काळजी घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे त्यांचा लागण घरातील इतर सदस्यांना देखील होत असल्याचे दिसत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
इतकेच नाही तर, होम क्वारंटाइन केलेले रुग्णतर चक्क घरातील एका खोलीत राहणे तर दूर, उलट ते त्यांच्या सोईने सोसायटीमधील आवारात फिरतानाही निदर्शनास आले होते. त्यांच्या अशा वागण्यामुळे सोसायटीमधील इतर रहिवाशांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, असे प्रकार पुन्हा होऊ नयेत याची काळजी घेण्यात आली असली, तरी हे रुग्ण घरात तितकीशी काळजी घेत नसल्याचे घरातील इतर सदस्यांना धोका आहे, असे पालिका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times