वाशिम: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांमुळं आता करोनासाठी लागणाऱ्या औषधी पुरवठ्यावर होऊ लागले आहेत. करोना उपचारासाठी लागणारे महत्वाचे असलेल रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागला आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे रुग्णाचे नातेवाइक आता शहरातील अनेक मेडिकल स्टोअर्सवर रेमडेसीवीर इंजेक्शनच्या शोधात फिरत आहेत.

वाशीम जिल्ह्यात करोना रुग्णाचा आकडा मागील ४० दिवसाच्या रुग्णाच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढलाय त्यामुळे उपचारासाठी रुग्णांची संख्या सुद्धा आपसूकच वाढली आहे.

अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत तर काहींनी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर करोनाच्या उपचारासाठी महत्वाचे असलेल रेमडेसीवीर इंजेक्शन या रुग्णांसाठी महत्वाच आहे. मात्र, आता या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय. खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णाचे नातेवाईक सध्या वाशीम शहरातील मेडिकल स्टोअर्समध्ये इंजेक्शनच्या शोधात फिरत आहेत.

जे डॉक्टर खासगी कोविड सेंटर चालणारे आहेत ते रेमडेसीवीर इंजक्शनच्या तुटवड्याची कारण दोन प्रकारामुळे वाढल्याच सांगतात कि पहिलं कारण रुग्ण संख्या वाढल्यामुळे इंजेक्शनची मागणी वाढली यात मार्केटमध्ये मागणी वाढल्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे वेगळीच बाजू समोर येत आहे. ती म्हणजे आपल्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर डॉक्टर या रेमडेसीविर इंजेक्शनचा वापर करत आहेत. तर काही रुग्ण आपल्या घरी उपचार घेत आहेत ते हि रेमडेसीवीर इंजेक्शनचा वापर करत आहेत. या कारणांमुळे रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे, असं वाशिमच्या कोव्हिड केअरचे संचालक डॉ. सचिन पवार यांनी म्हटलं आहे.

औषध विक्रेता संघटना हे वेगळ कारण समोर करत आहेत. याच्या मते रुग्णसंख्या एकदमच वाढल्यामुळे असं झाल आणि काही दिवसांपूर्वी मागणी कमी झाली असल्या कारणाने हा तुटवडा निर्माण झाला. सध्या तुटवडा जो निर्माण झाला आहे त्या बाबतीत आम्ही आजूबाजूच्या जिल्ह्यातून मागणी करतोय आणि तुट कमी करून रुग्णांना इंजेक्शन पुरवठा करण्याचा प्रयत्न चालू आहे, असं ड्रग असोशियनचे जिल्हा अध्यक्ष राजेश शिरसाठ यांनी म्हटलं आहे.

करोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी मागील काळात शासनाकडून मोठे प्रयत्न झाले याचा सकारात्मक परिणाम दिसायला ही लागला होता. मात्र, राजकीय आंदोलन,लग्न सोहळे,राजकीय मेळावे हे कोरोन वाढीस कारणीभूत ठरले आणि जे नको व्हायला पाहिजे होतं ते होत गेलं आणि आता अशी परिस्थिती आहे रुग्णाचा वेग हा दुपटीने वाढला औषध साठाही कमी पडू लागला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here