म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री करोना मुक्त झाल्यानतंर भाजपाच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालकडे काल बुधवारी सायंकाळी रवाना झाले. एक महिना महाजन आता तेथे भाजपाच्या प्रचारासाठी थांबणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील भाजपा नेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांना पश्चिम बंगाल येथिल निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाजन या आधीच पश्चिम बंगाल यथे प्रचारासाठी जाणार होते. मात्र, त्यांना करोना झाल्याने त्यांनी मुबंई येथे दहा दिवस उपचार घेतले. त्यानतंर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानतंर महाजन दोन दिवसांपूर्वीच जळगाव जिल्ह्यात आले होते. त्यांनी या दरम्यान त्यांनी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी करुन करोनाच्या पार्श्वभूमीवर उपचार व उपाययोजनांचा आढवा घेतला. त्यानतंर त्यांनी पश्चिम बंगाल येथे निवडणुक प्रचारात जाण्याचा निर्णय घेतला.

पश्चिम बंगाल येथे जाण्यापूर्वी खबरदारी म्हणून गिरीश महाजन यांनी मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जावून करोना चाचणी करुन घेतली होती. काल बुधवारी त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यानतंर गिरीश महाजन काल सायंकाळीच जळगावातून औरंगाबादमार्गे विमानाने भाजपाच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालकडे रवाना झाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here