आर्थिक कारणावरून चिडलेल्या मुलाने थेट सावत्र आईचाच खून केल्याचा खळबळजनक प्रकार कवठेमहंकाळ तालुक्यात घडला. झोपेत असलेल्या आईवर कुऱ्हाडीने सपासप वार करत मुलाने केलेल्या हल्ल्यात आई जागीच गतप्राण झाली. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी अमोल संभाजी सुर्वे (वय वर्षे २९) यास अटक करण्यात आली आहे. नंदा सुर्वे असे मृत महिलेचे नाव आहे. (an angry boy attacked his )
या घटनेची अधिक माहिती अशी, कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली या गावातील सुर्वे वस्तीवर संभाजी बाबू सुर्वे हे राहतात. त्यांची दोन लग्ने झाली आहेत. पहिल्या पत्नीस दोन मुली आहेत. दुसऱ्या पत्नीला एक मुलगा आहे. पहिली पत्नी असलेल्या नंदा सुर्वे हिच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. भविष्यकाळाची तरतूद म्हणून पतीने आपल्या नावावर दोन लाख रूपये बँकेत ठेवावेत अशी मागणी नंदा सुर्वे करत होती. याला सावत्र मुलगा असलेल्या अमोलचा विरोध होता. यातून घरात अनेकदा वाद होत होता. वडिलांकडे आई सतत पैशाची मागणी करत असल्याचा राग अमोलला होता.
क्लिक करा आणि वाचा-
बुधवारी रात्री पुन्हा या विषयावरून घरात वाद झाला. तेव्हा संशयित आरोपी अमोल तेथेच होता. आई व मुलात दोन लाखावरून जोरदार वाद झाला. बराच वेळ भांडण सुरू होते.त्यानंतर आई नंदा सुर्वे घरात झोपायला गेली. अमोलच्या मनातील राग कायम होता. त्याने कुऱ्हाडीने झोपेत असलेल्या आईवर हल्ला केला. कपाळावर,तोंडावर,गालावर व हातावर त्याने सपासप वार केले. या हल्ल्यात ती जागीच गतप्राण झाली.
क्लिक करा आणि वाचा-
याबाबत मुलाचे वडिल संभाजी सुर्वे यांनी कवठे महंकाळ पोलिसाद फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले व पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times