नागपूर: हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेच्या आई-वडिलांनी अखेर आपल्या मुलीचा मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. राज्याचे यांच्याशी चर्चेनंतर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला.

वाचा:

तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीचा आज मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली आहे. राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. पीडितेच्या कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माझ्या मुलीला त्वरीत न्याय द्या. आरोपीला तात्काळ शिक्षा द्या. त्याला शिक्षा होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या वडिलांनी घेतली होती.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीनं पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधला व लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ‘माझ्या मुलीला ज्या वेदना झाल्या, त्याच वेदना त्या नराधमाला द्यायला हव्यात,’ अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

वाचा:

कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी

हिंगणघाट प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतली आहे. नराधमाच्या हल्ल्यात मृत्यू झालेली तरुणी ही शिक्षिका होती. तिच्या कुटुंबाला तिचा आर्थिक आधार होता. ही बाब लक्षात घेऊन कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं आहे.

विशेष लेख:

एकतर्फी प्रेमातून विक्की नगराळे या माथेफिरूनं काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथील शिक्षण तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं होतं. पीडित तरुणी कॉलेजच्या दिशेनं जात असताना नगराळे यानं हा हल्ला केला होता. त्यात ही तरुणी ४० टक्क्यांहून अधिक भाजली होती. तिच्यावर सध्या नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून शर्थीचे प्रयत्न करत होते. दुर्दैवानं त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here