म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील जनसंपर्क कक्षात मॅनेजमेंट अर्थात खाटा व्यवस्थापन समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यामातून देण्यात आलेल्या क्रमांकाला एक कॉल करताच करोना रुग्णांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजन बेड खाली आहे की नाही याची माहीती मिळत असल्याने रुग्णांची गैरसोय टळत आहे. रुग्णांची फिरफीर न होता वेळेवर उपचार करणे यामुळे शक्य झाले आहे. (in you can get information about corona )

जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून करोना संसर्ग वेगात पसरत आहे. चोवीस तासांत ११०० ते १२०० नविन रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ८९ हजार १८ झाली आहे. महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे अॅक्टिव्ह रूग्णांचा आकडा देखील वाढला आहे. सद्यस्थितीत ११ हजार ८०३ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण १ हजार ६२५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या अॅक्टिव्ह तसेच दररोज येणाऱ्या नविन रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात करोना रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे. सरकारीच काय तर खासगी कोविड रुग्णालयांमध्ये देखील बेड साठी प्रतिक्षा करावी लागत आहे. बेड खाली आहे की नाही, याची माहिती नसल्याने यापूर्वी करोना रुग्णांना अॅम्बुलन्समध्ये घेवून फिरावे लागत होते. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास अडचणी तर येत होत्याच पण कुटंबियांची देखील फिरफिर होत होती.

यामुळे जिल्हाधिकारी यांच्या संकल्पेनूत जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे करोना रुग्णांना केवळ एक फोन करुन शासकीय रुग्णालयातील बेडची स्थिती करण्यासाठी एक क्रमांक जाहीर करण्यात आला. त्यासाठी एक खाटा व्यवस्थापन समिती देखील स्थापन करण्यात आली. ९३५६९४४३१४ हा क्रमांक नागरिकांसाठी जाहीर करण्यात आला आहे. येथे कॉल केल्यास बेड खाली आहे का? कीती खाली आहेत इतकेच नव्हे तर केव्हा बेड खाली होईल याची माहिती मिळत असल्याने रुग्णांची गैरसोय टळत आहे.

क्लिक करा आणि वाचा-
जिल्ह्यासह शहरातील व इतर ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी ही खाटा व्यवस्थापन समिती कार्य करीत आहे. ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर आवश्यक असलेल्या कोविड १९ पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय राखीव आहे. या समितीला गेल्या आठ दिवसात खाटा उपलब्धतेबाबत जिल्हाभरातून विचारणा झाली आहे. त्यामुळे रुग्णांची धावपळ न होता खाटा व्यवस्थापन अचूक पद्धतीने होत आहे. या समितीत ३ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

वॉर रुम देखील कार्यरत

वॉर रूममध्ये चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिफ्ट पद्धतीने लावण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयात दाखल कोविड १९ पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करणे, रुग्णांच्या जेवणासह इतर सुविधांविषयी विचारणा करणे तसेच वॉर्डातील दाखल रुग्णांना देखील या वॉर रूम सुविधेचा लाभ घेता आला आहे. वॉर रुमचे ८७६७१९९४७६ आणि ८७६७२४०८०१ हे क्रमांक आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

मृत्यू समन्वय समिती

शासकीय रुग्णालयात कोविड १९ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण उपचारांती मृत झाल्यास त्यांच्या अंत्यसंस्कार संदर्भातील माहितीसाठी मृत्यू समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. मयत रुग्णांच्या नातेवाईकांना सांत्वन व मदतीसाठी या समितीने गेल्या आठ दिवसात भरीव काम केले असून येथे ४ निष्णात कर्मचारी नेमण्यात आले आहे. या समितीचा ८७६७३२४१३३ हा क्रमांक रुग्णालय प्रशासनाने नागरिकांसाठी जाहीर केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here