याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निर्मल टर्निंग जवळील ऑटो स्टॉपवर मेहरसिंग गोविंदसिंग चव्हाण (४३) व अजय विनायक आवटे (४०) (दोघेही सती फैलचे रहिवासी) या दोघांमध्ये सायंकाळी प्रवाशी घेऊन जाण्यावरून वाद सुरू झाला. इतर रिक्षाचालकांनी दोघांमध्ये समजूत घातल्याने हा वाद निवळला. परंतु, काही वेळानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला आणि मेहरसिंग चव्हाण याने त्याच्या जवळील धारधार चाकूने अजय आवटे याच्या पोटामध्ये वार केला. यावेळी अजय आवटे हा रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान आरोपी मेहरसिंग चव्हाण यानेच अजय आवटे यास स्वतःच्या ऑटोमध्येच टाकून तातडीने उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल हुड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून सामान्य रुग्णालय येथून पोलिसांनी आरोपी मेहरसिंग चव्हाण यास रुग्णालय आवारातून ताब्यात घेतले.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान सती फैलसह परिसरातील नागरिकांनी सामान्य रूग्णालय व निर्मल टर्निंग परिसरात मोठी गर्दी केली होती.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times