सिंधुदूर्ग: जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी” (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसूचना आज महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली. (The area in has been declared a )

शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे सुपुत्र तेजस ठाकरे व शंकर बालसुब्रमण्यम यांनी लावला आहे. या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावे अशी मागणी होती.

यापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. आता आबोली येथील शिस्टुरा हिरण्यकेशीची यात भर पडली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ मंदिर येथे आढळून येते. येथे पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी देवाचा मासा प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे.

या क्षेत्रात गवे, हरीण, बिबटा, अस्वल, शेकरू, माकड, वानर, मुंगूस, साळींदर, खवले मांजर, भेकर आदी वन्यजीव आढळून येतात. तसेच साग, आंबा, किंजळ, ऐन, जांभा, उंबर, जांभूळ, अंजन, फणस अशा वृक्षप्रजाती, झाडे, झुडपे आणि वेलींचे ही येथे अस्तित्त्व आहे.

क्लिक करा आणि वाचा-
शिस्टुरा हिरण्यकेशी ही दुर्मिळ माशांची या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन होण्याच्यादृष्टीने आजचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे

वन्यजीव संशोधकांनी ॲक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री, विशेष करून आंबोली परिसरातील आणि त्याचे महत्व वाढणार आहे. जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशाप्रकारे हेरिटेजचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here