९ सदस्यांच्या समितीत सहअध्यक्ष असलेले अपर प्रधान मुख्य वनरक्षक विकास गुप्ता, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा अय्यर, मेळघाटच्या विभागीय वन अधिकारी पीयूषा जगताप, अमरावती वन विभागाच्या सहाय्यक वनरक्षक ज्योती पवार, सामाजिक वनीकरणचे वन परिक्षेत्र अधिकारी कोकाटे, सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी किशोर मिस्त्रीकोटकर, सदस्य सचिवांनी ठरवलेला स्थानिक स्वयंसेवी संस्थेचा सदस्य आणि अमरावतीचे मुख्य वनरक्षक प्रविण चव्हाण यांचा समावेश आहे.
क्लिक करा आणि वाचा-
ही चौकशी समिती दीपाली चव्हाण यांच्या सुसाइड नोटचा आधार घेऊन एकूण १६ मुद्द्यांवर चौकशी करणार आहे. विनोद शिवकुमार यांनी दीपाली चव्हाण यांना कसा त्रास दिला. तसेच सुसाइड नोटमध्ये नमूद घटनेची सखोल चौकशी करणे. दीपाली चव्हाण यांना उपवनरक्षकाने कोणती नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडली याचीही तपासणी करण्यात येणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
त्याच प्रमाणे दीपाली चव्हाण या गरोदर असतानाही शिवकुमार यांनी त्यांना पायी फिरवल्याने त्यांचा गर्भपात झाला असे सुसाइड नोटमध्ये नमूद आहे. या मुद्द्याची देखील सखोल चौकशी केली जाणार आहे. चव्हाण यांना घरी जाण्यासाठी कितीदा रजेची मागणी नाकारली, त्यांना कामाचा निधी देण्यात आला की नाही, उपवनरक्षकाने त्यांना त्यांच्या संकुलात बोलावून त्यांचा गैरफायदा घेतला काय याचीही तपासणी केली जाणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times