‘ए राजा यांचं भाषण केवळ आपमानकारक नाही तर अश्लील आणि महिलांच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहचवणारं आणि मातृत्वाचा अपमान करणारं आहे. या पद्धतीची वक्तव्यं निवडणूक आचारसंहितेचं गंभीर उल्लंघन आहे’ असं ए राजा यांच्याविरुद्ध कारवाई करताना निवडणूक आयोगानं म्हटलंय.
ए राजा यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना आपल्या पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांच्याशी केली केली होती. ‘स्टॅलिन यांनी योग्य पद्धतीनं जन्म घेतला हे मी म्हणू शकतो. म्हणजेच, विवाहानंतर आणि रीती परंपरेनुसार, नऊ महिन्यांत… तर हे प्रिमॅच्युअर बेबी आहेत, जे वेळेपूर्वीच पैदा झाले आहेत’ असं वक्तव्य ए राजा यांनी केलं होतं.
ए राजा यांच्या या वक्तव्याविरोधात एआयएडीएमकेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगानं या तक्रारीची दखल घेत ए राजा यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी घातलीय.
‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. परंतु, माझ्या वक्तव्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो’ असं म्हणत ए राजा यांनी आपल्या वक्तव्यावरून खेद व्यक्त केला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times