जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉलमध्ये बैठक सुरू आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळं पुणेकरांचं या बैठकीकडं लक्ष लागलं आहे. ()

लाइव्ह अपडेट्स:

  • लाॅकडाउनसारखे कडक निर्बंध लावावे. मात्र, ‘लाॅकडाउन’ हा शब्द वापरण्यात येऊ नये – राज्याचे कोविड विषयाचे तांत्रिक सल्लागार सुभाष साळुंके यांची सूचना
  • कडक निर्बंध लावण्याची गरज आहे. लसीकरणाबाबत फेसबुकवर, ट्विटरवर माहिती देण्यात यावी. लोकप्रतिनिधींना उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून व्यवस्थित माहिती मिळत नाही. लॉकडाऊन नको, तर कडक निर्बंध लावावेत – खासदार वंदना चव्हाण
  • महापालिकांनी पथारी व्यावसायिकांच्या करोना चाचण्या कराव्यात; तसेच सरकारी कार्यालयांमधील प्रत्येक कर्मचाऱ्याची चाचणी करण्यात यावी – रवींद्र शिसवे
  • लॉकडाउन हा पर्याय नाही. गर्दीच्या ठिकाणी आणि हॉटेल्समध्ये फेस शील्ड अनिवार्य करण्यात यावे – खासदार डॉ. अमोल कोल्हे
  • सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सभा आणि मिरवणुका टाळाव्या. लसीकरण वाढविण्यात यावे. रस्त्यांवर अनावश्यक फिरणाऱ्यावर निर्बंध लावा – खासदार गिरीश बापट
  • लॉकडाउन नको; पण कडक निर्बंध लावावेत – खासदार श्रीरंग बारणे
  • शहरात ७ दिवस कडक निर्बंध लावावे. त्यामध्ये सायंकाळी सहानंतर संचारबंदी, हॉटेल बंद करणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करणे असे निर्बंध लावले तर रुग्णसंख्या आटोक्यात येईल, महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची सूचना
  • जम्बो सेंटरमध्ये ३000 खाटा उपलब्ध असून, त्यापैकी प्रत्यक्ष २५० खाटा वापरण्यात येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी
  • चैनीच्या गोष्टींवर निर्बंध लावण्याची सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांची सूचना
  • लाॅकडाउनला खासदार गिरीश बापट, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यांचा विरोध
  • करोनाच्या आढावा बैठकीत पोलिस विभागाने सायंकाळी सहा वाजल्यापासून जमावबंदी लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर बैठकीत चर्चा सुरू

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here