अमरावती: शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने जुनी वस्ती येथील अलमासनगरातून आकीब हुसेन अख्तर हुसेनला (वय २३) याला अटक केली. त्याच्याकडून देशी कट्टा आणि तीन जीवंत काडतुसे असा एकूण ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध शस्त्र प्रकरणी पोलिसांनी दोन आठवड्यांत ३ लाख १८ हजारांचा माल जप्त केला आहे. यात २ लाख ७ हजार रुपये किंमतीचे सहा देशी बनावटीचे कट्टे, २६ हजार किंमतीचे २६ जिवंत काडतुसे, ७० हजारांची गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, १५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्त्वाखाली उपनिरीक्षक राजकिरण येवले, राजेश राठोड, दीपक दुबे यांनी ही कारवाई केली.

याआधी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत १३ मार्च रोजी फरीद नगर येथील वसीम सय्यद नूर (वय २६) याच्याकडून एक देशी कट्टा व १२ जिवंत काडतुसे, १६ मार्च रोजी पॅराडाईज कॉलनी येथील मो. असीम उर्फ लड्डू मो. इद्रीस (वय ३०) याच्याकडून एक देशी कट्टा व ३ जिवंत काडतुसे तसेच २२ मार्च रोजी शेख समीर मौलाना शेख अफसर (वय २५) आणि मोहंमद अवेस मो. लतीफ (वय २१) याच्याकडून ३ देशी कट्टे व ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here