मुंबई: ‘सचिन वाझेचं कॅरेक्टर खराब आहे. त्याला पुन्हा सेवेत घेऊ नका असं मी , आणि अनिल देशमुख यांना सांगितलं होतं. पण माझं ऐकलं गेलं नाही. सरकारनं ही मोठी चूक केली,’ असं परखड मत समाजवादी पक्षाचे नेते, आमदार यांनी व्यक्त केलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात याचा सहभाग असल्याचे पुरावे आता समोर आले आहेत. वाझेची पाठराखण करणारे व निलंबन रद्द करून त्याला पुन्हा पोलीस सेवेत घेणारे ठाकरे सरकार त्यामुळं टीकेच्या रडारवर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ‘सपा’चे नेते यांनी आपलं मत मांडलं आहे. ‘वाझेला पुन्हा सेवेत घेऊन सरकारनं मोठी चूक केली,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘ख्वाजा युनुस मृत्यू प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे. त्याच्या विरोधात खटला सुरू आहे. अशा परिस्थितीत त्याला सेवेत पुन्हा घ्यायला नको होते. त्याला पुन्हा घेण्यात आल्याचं समजताच मी संजय राऊत, शरद पवार, अनिल देशमुख यांच्याकडं गेलो होतो. त्याला घेऊ नका असं सांगितलं होतं. पण यांनी काहीतरी वेगळा सल्ला सरकारला दिला असावा. तो सल्ला मानून वाझेला सेवेत घेतलं गेलं. ही सर्वात मोठी चूक होती,’ असं आझमी म्हणाले.

वाचा:

‘सभागृहात विरोध पक्षाच्या नेत्यांनी मागणी केल्यानंतर वाझेला निलंबित केलं जायला हवं होतं. सत्ताधारी पक्षाच्या सोबत असूनही माझं हे मत आहे. त्या माणसाचं चारित्र्य पहिल्यापासून खराब होतं,’ असंही ते म्हणाले. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

परमबीर सिंग यांच्यावर पहिली कारवाई व्हायला हवी!

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरही अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘गृहमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांच्यावरच पहिली कारवाई व्हायला हवी. गृहमंत्री वसुली करायला सांगत होते तर त्यांनी त्याची कल्पना आधीच शरद पवार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना का दिली नाही? खरंतर परमबीर सिंग हे स्वत:च पूर्वीपासून वसुलीचं काम करतात. त्यांच्या विरोधात वसुलीच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांच्यावरच आधी कारवाई व्हायला हवी.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here