कोण हा जिंदल, तो शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबाबत वावगं बोलतोच कसं ? असं बोलताना त्याला लाज वाटत नाही का? याबाबत त्यानेच नव्हे तर भाजपने याबाबत दिलगिरी व्यक्त करावी, उठसूठ कशावरही प्रतिक्रिया देणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील अजून गप्प का आहेत, त्यांनी माफी न मागितल्यास मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा ग्रामविकास मंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिला. (rural development minister slammed chief )
भाजपच्या मिडिया सेलचे प्रमुख यांनी पवारांचे आजारपण आणि सचिन वाझे प्रकरणाबाबत चुकीचा आरोप केला होता. याचा निषेध करताना जिल्हा मध्यवर्ती बँकेत आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, पवार आजारी पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, जिंदल यांनी अतिशय बेताल वक्तव्ये करत पवारांचा अपमान केला आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही.
क्लिक करा आणि वाचा-
कोण हा जिंदल असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, माजी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे याबाबत गप्प का आहेत. त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. पवार हे आमचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल वावगं कुणी बोलल्यास ते आम्ही खपवून घेणार नाही. भाजपने तीन दिवसात याबाबत माफी न मागितल्यास मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
शंभर कोटीच्या आरोप प्रकरणी परमबीर सिंग यांची सखोल चौकशी करायला हवी. माफीचा साक्षीदार होण्यासाठीच ते केंद्राच्या तालावर नाचत आहेत. ते भाजपचे डार्लिंग असल्यानेच त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे अशी टीकाही मुश्रीफ यांनी केली.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times