Live अपडेट्स…
>> मला व्हिलन ठरवलं गेलं तरी देखील मी काम करतच राहणार- मुख्यमंत्री.
>> सध्या राज्यात करोना चाचण्या करणाऱ्या लॅबची संख्या ५०० वर पोहोचली आहे- मुख्यमंत्री.
>> आरटीपीसीआर चाचण्या अधिकाधिक करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे- मुख्यमंत्री.
>> या पुढील काळात दररोज अडीच लाख चाचण्या महाराष्ट्रात होणार- मुख्यमंत्री.
>> लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर झाल्याने राज्यात करोना वाढला- मुख्यमंत्री.
>> करोनाच्या काळातही विरोधकांचा ‘शिमगा’- मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला.
>> मधल्या काळात नियम पाळण्यात शिथीलता आला- मुख्यमंत्री.
>> मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद सुरू
>>
>> राज्यातील करोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्षा या निवासस्थानी आढावा बैठक घेतली.
>> राज्यात लॉकडाउन लागू करू नये असे विरोधकांपासून अनेक घटकांचे म्हणणे आहे.
>> मात्र, राज्यातील एकूण परिस्थिती पाहिल्यानंतर सरकार लॉकडाउन जाहीर करणार का?… की लागू करणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
>> लॉकडाउन नको असेल तर मास्कचा वापर करणे, योग्य ते अंतर राखणे आणि हात वारंवार स्वच्छ धुणे या गोष्टी कराव्याच लागतील असे सरकारने वेळोवेळी जाहीर केले आहे.
>> राज्यात करोनाचा कहर सुरूच राहिला आणि जनतेने करोना प्रतिबंधाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले नाहीत तर लॉकडाउन लागू करावा लागेल, असे संकेत सरकारने वेळोवेळी दिले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times