नवी दिल्ली : सांख्यिकी नमुना पद्धतीचा वापर करून देशातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय. भारतात संक्रमणाचा धोका एप्रिलच्या मध्यात सर्वोच्च टप्प्यावर पोहचेल त्यानंतर मे महिन्याच्या शेवटपर्यंत संक्रमणाच्या प्रकरणात घट पाहायला मिळू शकेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

भारतात करोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेदरम्यान ‘सूत्र’ नावाच्या या गणितीय दृष्टीकोनातून अंदाज व्यक्त करण्यात आला होता. करोना संक्रमणाच्या रुग्णांच्या संख्येत ऑगस्ट महिन्यात वाढ होईल आणि सप्टेंबरपर्यंत हा आकडा वाढत जाईल त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये ही संख्या कमी होईल, असा अंदाज यातून व्यक्त करण्यात आला होता.

आयआयटी कानपूरचे मनिंद्र अग्रवाल यांच्यासहीत इतरही वैज्ञानिकांनी या सूत्राचा वापर करत संक्रमणाच्या प्रकरणांत सध्याच्या परिस्थितीतीचा अंदाज लावण्यासाठी वापर केला.

एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत सर्वोच्च टप्पा गाठेल, असं हा अंदाज सांगतोय. गेल्या अनेक दिवसांच्या अभ्यासात आम्हाला असंच दिसतंय की भारतात १५ ते २० एप्रिल दरम्यान संक्रमणाच्या संख्येत मोठी वाढ होईल. ही संख्या खूपच तेजीनं वाढत जाते परंतु, त्यानंतर संक्रमणाच्या प्रकरणांत घटही त्याच तेजीनं नोंदविली जाईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत करोना संक्रमणाच्या रुग्णांच्या संख्येत घट होईल, असं अग्रवाल यांनी ‘पीटीआय’शी बोलताना म्हटलंय.

गेल्या काही दिवसांत अत्यंत तेजीनं वाढलेल्या संख्यामुळे काही अंदाजात काही अनिश्चितता आहे. सध्या प्रत्येक दिवशी एक लाखांच्या आसपास प्रकरणं समोर येत आहेत. परंतु, ही संख्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. परंतु वेळ तीच राहील… १५ ते २० एप्रिल दरम्यान…

सगळ्यात जास्त तेजीनं वाढ दिसून येईल ती पंजाबमध्ये… त्यानंतर महाराष्ट्रात हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचा अंदाज आहे.

हरयाणाच्या अशोका विद्यापीठाच्या गौतम मेनन यांच्यासहीत अनेक तज्ज्ञांनीही एप्रल आणि मे महिन्याचाय मध्यात संक्रमणाच्या आकड्यात भर पडेल, असा अंदाज व्यक्त केलाय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here