अलीपूरदार : दरम्यान दोन टप्प्यांतील मतदान पार पडलंय. परंतु, अद्यापही पक्ष बदलाचे धक्के सुरूच आहेत. शुक्रवारी बंगालच्या अलीपूरदार जिल्ह्यात गृहमंत्री यांच्या एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच सभेत तृणमूल काँग्रेसचे नेते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

मोहन शर्मा हे तृणमूल काँग्रेसचे जुने नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी अलीपूरदार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी हाताळली होती. सोबतच ते अलीपूरदार जिल्हा परिषदेचे सल्लागारही होते.

गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत मोहन शर्मा यांच्यासहीत तृणमूलच्या हजारो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या सेंट्रल कमिटीचे महासचिव अरविंद मेनन यांनी मोहन शर्मा यांच्या हाती पक्षाचा झेंडा सोपवला.

पश्चिम बंगालमध्ये आद्यापही सहा टप्प्यांमध्ये मतदान बाकी आहे. अशा वेळेस मोहन शर्मा यांनी पक्षाला दिलेल्या या जोरदार झटक्यामुळे पक्षाची मोठी पडझड होऊ शकते. याचं कारण म्हणजे मोहन शर्मा यांची अलीपूरदार जिल्ह्यात चांगलीच पकड असल्याचं म्हटलं जातं.

पश्चिम बंगालच्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. २७ मार्च आणि १ एप्रिल रोजी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलंय. तिसऱ्या टप्प्यातील ३१ जागांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here