म.टा.प्रतिनिधी, नागपूर

वरिष्ठांच्या जाचामुळे आत्महत्या केलेल्या (Deepali Chavan) या वनपरिक्षेत्र अधिकार्‍याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याच्या निर्णय इंडियन फ़ॉरेस्ट सर्व्हिस असोसिएशन (IFSA) या वन विभागातील अधिकार्‍यांच्या संघटनेने घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ( decided to give rs 5 lakh to family)

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणात भारतीय वनसेवेच्या अधिकार्‍यांना टीका सहन करावी लागली. दीपाली यांच्या मृत्युनंतर तब्बल आठ दिवसांनी वनाधिकार्‍यांच्या संघटनेने या विषयावर बैठक घेतली. त्यामध्ये, अधिकार्‍यांकडून प्रत्येकी ३ हजार रुपये निधी संकलित करून पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारच्या घटनांमुळे विभागातील वातावरण बिघडू नये. भारतीय वन सेवा तसेच राज्य सेवा अशा दोन्ही अधिकार्‍यांनी आपल्याकडील कर्मचार्‍यांचा संवेदनशीलतेने विचार करावा. या घटनेमुळे मनोबल खचू देऊ नये. तसेच भारतीय वन सेवेतील अधिकारी विरुद्ध इतर असे स्वरुपही येऊ नये, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा-

रेड्डींना दोषी ठरविणे चुकीचे!

दरम्यान, या बैठकीत काही अधिकार्‍यांनी चव्हाण प्रकरणात निलंबित झालेले एम.एस.रेड्डी यांना आताच दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केल्याची माहिती आहे. मात्र, शिवकुमार यांचे वर्तन चुकीचे होते याबाबत सर्वांचे एकमत असल्याचे बैठकीला उपस्थित एका वरिष्ठ वनाधिकार्‍याने सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here