वाचा:
सचिन वाझे हा गेल्या २२ दिवसांपासून एनआयएच्या कोठडीत आहे. एनआयएनं ताब्यात घेतल्यानंतर वाझेनं छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर जे. जे. रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली होती. नंतरच्या चौकशी दरम्यान वाझेनं दोन-तीन वेळा प्रकृतीची तक्रार केली होती. तेव्हा त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्याला मधुमेहाचा त्रास असल्याचंही समोर आलं होतं. आता त्याला हृदयविकाराचा त्रास असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी अर्जाद्वारे न्यायालयाला दिली आहे. त्यानंतर न्यायालयानं वाझेचा वैद्यकीय अहवाल मागवला आहे.
वाचा:
सचिन वाझेच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. अधिक चौकशीसाठी एनआयएला त्याच्या कोठडीत वाढ हवी आहे. त्याबाबतच्या सुनावणीसाठी आज वाझेला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. यावेळी वाझेचा वैद्यकीय अहवाल सादर केला जाण्याची शक्यता असून त्यावर न्यायालयात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘त्या’ महिलेची १३ तास चौकशी
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याजवळ गाडीत स्फोटके ठेवण्याआधी सचिन वाझेसह जी महिला दिसली होती, तिची राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) १३ तास चौकशी केली. या महिलेच्या माध्यमातून वाझे हे राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते, असा ‘एनआयए’चा संशय आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times