वाचा:
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत असल्याची काँग्रेसची पूर्वीपासूनच तक्रार आहे. काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत फारसं स्थान नसल्याचं यापूर्वी काही नेत्यांनी बोलूनही दाखवलं होतं. तसंच, निधीवाटपा बाबतही आमदारांच्या काही तक्रारी होत्या. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या नेत्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष , महसूलमंत्री , सार्वजनिक बांधकाम मंत्री हे यावेळी उपस्थित होते.
वाचा:
एच. के. पाटील यांनी पत्रकारांना बैठकीतील चर्चेची माहिती दिली. ‘काँग्रेस मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा झाली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निधी वाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप होते, ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून आढावा घेतला पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली. किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं पाटील यांनी सांगितलं. ही चर्चा सकारात्मक झाल्याचंही ते म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times