भारत भालके यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या पंढरपुर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची लढत आता प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपनं पोटनिवडणुकीसाठी समानाधन अवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे तर, महाविकास आघाडीकडून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं ही लढत अटीतटीची होणार आहे. असं असतानाच पंढरपुर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
भाजपचे नेते व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असून काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यात भेट होणार असल्याचंही बोललं जात आहे.
पवार साहेब बोलतील ते करणार
दरम्यान, भारत भालके यांच्या निधनानंतर शरद पवारांनी सरकोली येथे भालके कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्याच दरम्यान काळे आणि पवार यांच्यातही भेट झाली होती. त्याचवेळी आमच्याकडून काही चुका झाल्या होत्या. पण, साखर कारखान्यांसाठी शरद पवारांनी चांगलं काम केलं आहे. त्यांच्याच मदतीमुळं पंढरपुरमधील विठ्ठल, भीमा आणि चंद्रभागा कारखाने सुरु झाले आहेत, कल्याणराव काळे यांनी म्हटलं होतं. तसंच, शुक्रवारी सरकोली येथील एका कार्यक्रमात पवार आणि काळे एकाच मंचावर उपस्थित होते. तेव्हाही त्यांनी भविष्यात पवार साहेब जे म्हणते त्यानुसारच काम करणार, असं वक्तव्य केलं होतं. काळे यांच्या या वक्तव्यामुळं सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं.
कोण आहेत कल्याणराव काळे?
कल्याणराव काळे हे सोलापुरातील मोठे नेते आहेत २०१९मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता पंढरपुर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या निवडणुकीत काळे गट राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंचा प्रचार करणार असल्याचंही बोललं जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times