वाचा: वाचा:
तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीचा आज मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली आहे. पीडित तरुणीच्या दरोडा गावात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
वाचा:
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. मी तिच्या कुटुंबीयांच्या आणि हिंगणघाटवासीयांच्या दुःखात सहभागी आहे, असं अजित पवार म्हणाले. ‘हिंगणघाटमधील बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही. महाराष्ट्राच्या मातीसाठी ही लाजिरवाणी घटना आहे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. खरंतर आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच त्या बहिणीला खरी श्रद्धांजली ठरेल,’ असं पवार म्हणाले.
‘अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार अधिक संवेदनशीलपणे व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. ही विकृती आहे. याविषयी समाजाचंही प्रबोधन झालं पाहिजे. महिलांच्या सन्मानाप्रती समाजानंही जागरूक राहिलं पाहिजे. पोलीस खात्याचा समाजाला आदरयुक्त दबदबा वाटला पाहिजे, असं काम करण्याची गरज आहे. मुलींनी देखील काही त्रास झाल्यास तात्काळ तक्रार करावी. एखादी मुलगी वा महिला भीतीनं तक्रार करत नसेल तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही आक्षेपार्ह लक्षात आल्यास संबंधितांनी दक्ष राहून त्याबाबत तक्रार करायला हवी,’ अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.
वाचा: ”
दरम्यान, राज्य सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेतली असून पीडितेच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करेल,’ असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. तसंच, पीडित तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times