सोलापूरः आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही दिवशीही बंडोबा थंड न झाल्याने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक ही बहुरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळं या मतदारसंघावर वर्चस्वासाठी समोरासमोर लढतीची मनिषा मनी बाळगणाऱ्या राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख पक्षांच्या गोटात खळबळ माजली आहे.

बंडखोरांच्या या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची आता चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अर्ज दाखल केलेल्यापैकी ११ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात परिचारक गटाचे नेते अन पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांचा समावेश आहे.

एकंदरीत भाजपच्या समाधान आवताडे यांच्यासमोर भाऊबंधकीचं तर यांच्यासमोर पंढरपूर तालुका शहर आणि ग्रामीण अशा एकगठ्ठा मतांच्या मतविभागणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या निवडणुकीच्या आखाड्यात आता १९ उमेदवार मैदानात असून कोण कुणाची अन् किती मत खाणार याचीचं चर्चा तालुक्यात रंगलीय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here