वाचा-
वाचा-
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त आल्या पाठोपाठ या स्पर्धेशी संबंधित इव्हेट मॅनेजमेंटशी संबंधिक सहा जणांना करोना झाल्याचे समोर आले. ही गोष्ट झाली फक्त स्टाफ संदर्भातील. पण या शिवाय कोलकाता नाइट रायडर्स संघातील फलंदाज नितीश राणे (आता नेगेटिव्ह), आज (शनिवारी) दिल्ली कॅपिटल्सचा ऑलराउंडर आणि चेन्नई सुपर किंग्जचा एका सदस्याला (content team) करोना झाल्याचे समोर आले आहे.
वाचा-
वाचा-
करोना झालेले इतके लोक आढळल्यानंतर आयपीएलशी संबंधित लागण झालेल्यांची संख्या १९ वर गेली आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच गेल्या वर्षीचे उपविजेते दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला. संघातील ऑलराउंडर अक्षर पटेलला करोनाची लागण झाली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला असताना त्यांना हा दुसरा झटका बसला. दुसऱ्या बाजूला चेन्नई संघातील एका खेळाडूला करोना झाल्याचे वृत्त क्रिकबझने दिले आहे. या खेळाडूचे नाव अद्याप समोर आले नाही.
वाचा-
वाचा-
करोना व्हायरसची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर इंदूर किंवा हैदराबाद येथील मैदानांचा स्टॅड बाय म्हणून ठेवण्यात आले आहे. वानखेडेवर आयपीएलमधील १० लढती होणार आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी ४७ हजार करोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात लॉकडाउनची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांवर देखील संकटाचे ढग जमा झाले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times