अमरावती: मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचा जामीनअर्ज आज अचलपूर कोर्टाने फेटाळून लावला. तसेच रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्याचे आदेशही न्यायालयाने आज दिले. (‘s bail plea rejected by court)

गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने रेड्डी यांच्या वकिलाने अचलपूर येथील तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक एक मध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज शनिवारी दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतली. मात्र न्यायमुर्ती एस. ए. मुंगीलवार यांनी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. रेड्डी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास रेड्डी फरार होण्याची शक्यता दर्शवण्यात आली. या युक्तीवादानंतर रेड्डी यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. धारणी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शिवकुमार याच्या त्रासासंदर्भात दीपालीने रेड्डी यांना पत्राद्वारे माहिती दिली होती. मात्र, त्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आत्महत्या प्रकरणात रेड्डींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याच्या व अटकेच्या भीतीने रेड्डी घाबरले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
त्यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी न्यायालयापुढे सरकारी अभियोक्ता अॅड. परिक्षीत गणोरकर, सहा. शासकीय अभियोक्ता अॅड. जी.ए.विचोरे व अॅड. डी.ए. नवले बाजु मांडली तर श्रीनिवास रेड्डी यांचे पक्षकार अॅड. डी. वाधवाणी यांनी बाजू मांडली.

क्लिक करा आणि वाचा-
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी सुसाई़ड नोट लिहिली होती. ती नोट त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांना उद्देशून लिहिली होती. त्यातून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here