हर्षदा सोनोने, अकोला

आज अनेक शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेल्या या प्रयोगातून ते लाखो रुपये कमवत आहेत. अशाच यशस्वी आणि वेगळी वाट चोखाळणारा एक शेतकरी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे यशस्वी प्रयोग करत आहे. या तरुण शेतकऱ्याने आपल्या दहा एकरात संपूर्ण टरबूज पिकाची लागवड केली आहे. दरम्यान यंदा एका एकरात त्यांनी पिवळ्या रंगाची टरबुजाची शेती केली. आरोही नावाचे पिवळ्या रंगाचं हे टरबूज आहे. या शेतीतून ते सध्या लाखोंची कमाई करत आहे. ऋषिकेश विजयराव तिडके असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी शेती विषयात एमबीए पदवी मिळवली आहे. (cultivation of a unique experiment of a young farmer in )

देशात मोठ्या प्रमाणात पारंपारिक शेती केली जात आहे. पण अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील या शेतकऱ्यानं आपल्या शेतात वेगळा प्रयोग केलाय. यंदा त्यांनी पिवळ्या टरबुजाचे उत्पादन घेतले. आपल्या दहा एकरातील एका एकरात तर नऊ एकरात लाल टरबूजाची लागवड केली आहे. त्यांनी केलेल्या या पिवळ्या टरबूजाच्या शेतीला यश आले असून हे टरबूज लाल टरबुजापेक्षाही गोड असल्याचे त्याने म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या पिवळ्या तरबुजाला मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या ४ वर्षांपासून आठ ते दहा एकरात लालरंगाच्या टरबुजाची लागवड करणाऱ्या या शेतकऱ्याला नेटवरुन पिवळ्या टरबुजाची माहिती मिळाली. त्यानंतर ऋषिकेश यांनी पिवळ्या टरबुजाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या टरबुजाची लागवड करण्यासाठी बियाणे मागवले.

क्लिक करा आणि वाचा-
तसेच या शेतीची पूर्ण माहिती घेऊन एका एकरात ही शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी ही शेती करण्यासाठी ४० हजारांची गुंतवणूक करुन एक लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. दरम्यान ,या फळाला मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळत आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here