सचिन वाझे यांना ठोठावण्यात आलेल्या कोठडीचा कालावधी आज संपल्यानंतर त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टात वाझे यांच्या वकिलासह एनआयएच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. हा युक्तीवाद सुमारे दोन तास चालला. मात्र, कोर्टाने एनआयएच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य मानला आणि वाझे यांच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली.
आरोपीच्या अंधेरी येथील डीसीबी बँकेच्या लॉकरकडून कागदपत्रं मिळाली आहेत. लॉकरमध्ये सापडलेल्या वस्तूंची चौकशी, होणे गरजेचे असल्याचे एनआयएने कोर्टात सांगितले.सीसीटीव्ही डेटाचा १२० टीबी डेटा आढळला असून त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच यात आयपी अॅड्रेसची देखील पडताळणी होणे आवश्यक असल्याचे कोर्टात सांगण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच जप्त करण्यात आलेल्या कारच्या नंबर प्लेटची तपासणी होणे बाकी आहे. तसेचआरोपींचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून त्याची देखील तपासणी करावी लागेल, असे एनआयएने कोर्टाला सांगितले. मिठी नदीत अनेक प्रकारच्या वस्तू आढळल्या असून त्यांची तपासणी करण्याचे काम बाकी आहे. शिवाययाप्रकरणात आतापर्यंत एकूण ५० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. असा युक्तीवाद करत एनआयएच्या वकिलांनी वाझे यांना एनआयए कोठडी देण्याची मागणी केली.
क्लिक करा आणि वाचा-
वाझे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले अनेक आरोप मान्य केल्याचे एनआयएने मागील सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगितले होते. मात्र, एनआयएकडे आपण कशाचीही कबुली दिली नसल्याचे वाझे यांनी आज सांगितले. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आपण कोणतीही कबुली दिलेली नसून अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या जिलेटीनचा आरोपही आपल्यावर लावण्यात आल्याचे वाझे यांनी न्यायालयाला सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, आज सचिन वाझे यांची सुनावणी होती. यावेळी त्यांचे बंधू सुधर्मही उपस्थित होते. यावेळी वाझे आणि त्यांच्या भावाची काही मिनिटांसाठी भेट झाली. त्यानंतर सुधर्म यांनी आमचा एनआयए आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असं सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times