लाइव्ह अपडेट्स:
>> इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी जळगावला असलेला भाऊ घरी परतताच होणार अंत्यसंस्कार – निकटवर्तीयांची माहिती
>> पीडित तरुणीवर संध्याकाळी चार वाजेनंतर होणार अंत्यसंस्कार
>> अशा घटनांतील गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून आंध्रपेक्षाही अधिक कडक कायदा करू – उद्धव ठाकरे
>> माता-भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या गोष्टी कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत – उद्धव ठाकरे
>> गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असा सरकारचा प्रयत्न. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर फासावर लटकवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
>> खासदार रामदास तडस यांनी केलं पीडितेच्या कुटुंबीयांचं सांत्वन
>> लोकांनी शांतता राखावी. तपासात कुठलीही त्रुटी राहणार नाही, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांची ग्वाही
>> पीडित तरुणीच्या घराबाहेर गावकऱ्यांची प्रचंड गर्दी
>> मुलीचं पार्थिव पाहताच कुटुंबीय, नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला
>> जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार
>> संतप्त ग्रामस्थांची रुग्णवाहिकेवर दगडफेक
वाचा:
>> पीडित तरुणीचे पार्थिव दारोडा या तिच्या मूळ गावी दाखल
वाचा:
>> आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर, रास्ता रोको
>> तरुणीच्या मृत्यूनंतर दारोडा या तिच्या मूळ गावात कमालीचा तणाव
वाचा:
>> आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची सर्वच स्तरांतून मागणी
>> पीडित तरुणीच्या मृत्यूचे राज्यभरात पडसाद
>> हिंगणघाट जळीत कांडातील पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times