मुंबई: आणि बच्चन ही बॉलिवूडची सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी आहे. ‘उमराव जान’ चित्रपटाच्या सेटवर दोघंही प्रेमात पडले आणि २००७ मध्ये त्यांनी लग्न केलं. त्याच्या या लग्नाची खूप चर्चाही झाली. कारण त्यावेळी झालेलं हे सर्वात भव्य लग्न होतं. अनेकांना वाटतं की, अभिषेक हा अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे म्हणून ऐश्वर्यानं त्याच्याशी लग्न केलं पण वास्तवात असं नाहीये.

अनेक लोकांना हे माहीत नाही की, अभिषेक बच्चननं ऐश्वर्याला जानेवारी २००७ रोजी न्यूयॉर्कमधील एका हॉटेलच्या बाल्कनीमध्ये प्रपोज केलं होतं. या एन्गेजमेंटनंतर या दोघांनी आपलं नात्याचा सर्वांसमोर खुलासा केला होता. त्यानंतर बॉलिवूडच्या रोमँटिक कपल्समध्ये या दोघांचं नाव घेतलं जातं.

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नानंतर अनेकांना असं वाटतं की, तो मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे त्यामुळे ऐश्वर्यानं त्याच्याशी लग्न केलं. पण याबाबत अभिषेकनं २०१४ मध्ये ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये एक खुलासा केला होता. तो म्हणाला होता, ‘ऐश्वर्यानं मी अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे किंवा मी स्टार आहे म्हणून लग्न केलेलं नाही. तसंच मी सुद्धा ती जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे किंवा खूप मोठी स्टार आहे म्हणून तिच्याशी लग्न केलेलं नाही. वास्तवात असं काहीच नाही. आम्ही व्यक्ती म्हणून एकमेकांच्या प्रेमात पडलो.’

अभिषेक पुढे म्हणाला, ‘ती खूप सुंदर आहे आणि माझ्यासाठी ही या जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. मी जेव्हा स्वतःला आरशात पाहतो तेव्हा मला स्वतःची भीती वाटते. मी तिच्याशी कधीच स्वतःची तुलना करू शकत नाही. पण तिचं हे सौंदर्यामुळे आम्ही एकमेकांच्या सोबत असण्याचं कारण नक्कीच नाहीये.’

जगातल्या सर्वात सुंदर महिलेशी लग्न केल्यानंतर तुला असुरक्षित वाटतं का? असा प्रश्न विचारल्यानंतर अभिषेक म्हणतो, ‘मला असं काहीच वाटत नाही. उलट मी आतापर्यंत ज्या लोकांना भेटलो आहे त्या सर्वांमध्ये ऐश्वर्या खूपच विनम्र व्यक्ती आहे. तिचा स्टारडमचा तिला अजिबात गर्व नाही.’

अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो लवकरच वेब सीरिज ‘ब्रीद’मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो ‘दसवी’ आणि ‘बॉब बिस्वास’, ‘बिग बुल’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here