बीड: ‘आपण स्त्रीला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संरक्षणमंत्री म्हणून पाहू शकलो. पण स्वकर्तृत्वानं पुढं येणाऱ्या सामान्य महिलेला सुरक्षा देऊ शकलो नाही,’ अशी खंत माजी मंत्री व भाजप नेत्या यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर व्यक्त केली आहे.

वाचा:

नागपूरमधील ‘ऑरेंज सिटी’ रुग्णालयात उपचार घेणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीचा आज मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली आहे. पीडित तरुणीच्या दरोडा गावात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. राजकीय, सामाजिक व सिनेसृष्टीतील कलाकारांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

वाचा:

पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हिंगणघाटची घटना मनाचा थरकाप उडवणारी आहे. सुन्न आणि अपराधी वाटतंय. इतक्या शतकांमध्ये आपण स्त्रीला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संरक्षणमंत्री म्हणून पाहू शकलो. पण स्वत:चं कर्तृत्व दाखवणाऱ्या स्त्रीला संरक्षण देऊ शकलो नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘पीडित तरुणीच्या कुटुंबाचं दु:ख कल्पनेच्या पलीकडचं आहे. ते कधीही न भरून येणारं आहे. त्यांच्या आणि समाजाच्या मनावर ओरखडे ओढणाऱ्या अशा क्रूर अहंकारी गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या मार्फत देहदंडाची शिक्षाच दिली पाहिजे,’ असा संताप पंकजांनी व्यक्त केला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here