कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ( ) यांनी निवडणूक आयोगाकडे ( ) तक्रार केली होती. त्यावर आयोगाने उत्तर दिलं आहे. नंदीग्राममध्ये मतदान क्रमांक ७ वर शांततेत मतदान झालं. तिथे कुठल्याही प्रकारचा हिंसाचार झालेला नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

तुम्ही पत्रातून केलेल्या दाव्यात कुठलेही तथ्य नाही. १ एप्रिलला नंदीग्राममध्ये मतदानात कुठलाही व्यत्यय आला नाही. बीएसएफच्या जवानांवर लावलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहे. हिंसा आणि मतदारांना धमकावल्याचा आरोपही चुकीका आहे. नंदीग्राममध्ये मतदान केंद्र ७ वर मतदान योग्य आणि शांततेत झालं, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १ एप्रिलला गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे ६३ तक्रारी केल्या. निवडणुकीत केंद्रीय सुरक्षा दल हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असून आपल्या तक्रारी गंभीरतेने घेत नसल्याचा आरोप ममतांनी केला. गृहमंत्री अमित शहा स्वतः सीआरपीएफ, बीएफएफ आणि इतर जवानांना सूचना देत आहेत. त्यांनी फक्त भजपा आणि त्यांच्या लोकांनाच मदत करावी, असा आरोप ममतांनी केला. तसंच निवडणूक आयोगाने जे मौन साधले आहे, त्याबद्दल आपल्याला खेद आहे. आम्ही अनेक पत्र लिहिली. पण आयोग भाजप उमेदवारांचे समर्थन करत असल्याचाही आरोप ममतांनी केला.

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील मतदान क्रमांक ७ मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे, अशी तक्रार ममतांनी केली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने ममतांना उत्तर दिलं आहे. विशेष निरीक्षक अजय नायक आणि पोलीस प्रशासनावर लक्ष ठेवून असलेले निरीक्षक विवेक दुबे यांनी या प्रकरणी शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता आपला अहवाल सादर केला. त्यात संबंधित मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारचा गडबड झाली नसल्याचं म्हटलं आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here