मुंबई : मुंबई इंडियन्सने काही वेळापूर्वी सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कर्णधार रोहित शर्मासह मुख्य प्रशिक्षक जयवर्धने यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचबरोबर मुबंई इंडियन्सचा संघ आयपीएल खेळताना नेमकं काय करत असतो, हेदेखील या व्हिडीओमधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच पसंत पडला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबई इंडियन्सने गेल्यावर्षी आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाची मानसीकता कशी होती. ते नेमकं काय करत होते आणि हा संघ नसून एक कुटुंब कसं आहे, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. आयपीएल सुरु असताना खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी त्यांच्यामधील संवाद किंवा मैत्रीपूर्ण नातं वाढवण्यासाठी नेमकं काय केलं जातं, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.

खेळाडूंना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये संघभावना जागृत करण्यासाठी काही खेळ खेळवले जातात, ज्याचा क्रिकेटशी काहीही संबंध नसतो. त्याचबरोबर खेळाडूंसाठी काही खास गोष्टींचे आयोजन केले जाते, जेणेकरुन खेळाडू संघातील खेळाडूंबरोबर आपला आनंद व्यक्त करु शकतील. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे खेळाडू आयपीएल सुरु असताना नेमकं काय करत असतात, हे या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक९ एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई
१३ एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई
१७ एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई
२० एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई
२३ एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई
२९ एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली
१ मे- विरुद्ध CSK- दिल्ली
४ मे- विरुद्ध SRH- दिल्ली
८ मे- विरुद्ध RR- दिल्ली
१० मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू
१३ मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू
१६ मे- विरुद्ध SK- बेंगळुरू
२० मे- विरुद्ध RCB- कोलकाता
२३ मे- विरुद्ध DC- कोलकाता

यावर्षी मुंबई इंडियन्सच्या लढती २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजीच्या या दुपारी ३.३० ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असतील. यावर्षी करोना व्हायरसमुळे आयपीएलमधील सामने आठ शहरांमध्ये होणार नाहीत. यावेळी ठराविक शहरांमध्येच आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वाधिक सामने चेन्नईमध्ये खेळणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here