पुणे: राज्य सरकारने नव्याने निर्बंध लावले असताना, त्यापैकी सर्वांत कडक निर्बंध हे पुण्यासाठी लागू केले जाणार आहेत. पुण्यात संचारबंदीचा कालावधी हा सायंकाळी सहा ते सकाळी सहा असाच राहणार असून, महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसेस या बंदच ठेवण्यात येणार आहेत. सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे बंद केले जाणार असून, खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे. ( )

वाचा:

संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने कठोर मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. त्यामध्ये दर आठवड्याला शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सातपर्यंत , तर दररोज रात्री आठ ते सकाळी सात या काळात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राव म्हणाले, ‘राज्य सरकारने नव्याने निर्बंध लावले आहेत. मात्र, पुण्यातील परिस्थिती ही निराळी आहे. रविवारी जिल्ह्यात १३ हजारांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यात सर्वांत कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या पुण्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा असा संचारबंदीचा कालावधी असून, त्यामध्ये बदल करण्यात येणार नाही’

वाचा:

राज्य सरकारने सार्वजनिक आणि खासगी वाहतूक ही नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र, पुण्यात ‘पीएमपीएल’च्या बसेस या बंदच ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे राव म्हणाले. वित्तीय सेवा वगळून इतर खासगी कार्यालये ही बंद करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील खासगी कार्यालयांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे लेखी आदेश सोमवारी काढण्यात येणार आहेत. त्यामधून वृत्तपत्रे आणि अन्य प्रसिद्धी माध्यमांची कार्यालयेही वगळण्यात आली आहेत. सरकारी आणि निमसरकारी कार्यालये ही ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत, अशी माहिती राव यांनी दिली.

वाचा:

राज्य सरकारने सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीनंतर लॉकडाउन आणि राज्य सरकारच्या नवीन निर्बंधांचे पालन, यावर चर्चा होणार आहे, असे राव यांनी नमूद केले.

पुण्यासाठी हे प्रमुख निर्बंध

– संचारबंदीचा कालावधी सायंकाळी सहा ते सकाळी सहा असाच असणार.

– पीएमपीएलच्या बसेस बंदच ठेवणार.

– खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ करणे बंधनकारक.

– वृत्तपत्रे आणि अन्य प्रसार माध्यमांची कार्यालये सुरू राहणार.

– सलून, ब्युटी पार्लर, स्पा बंद.

– लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here