नवी दिल्लीः छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये झालेल्या भीषण नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी ( ) केंद्रीय गृहमंत्री ( ) यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीला गृह सचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

२२ जवान शहीद, अद्यापही १ बेपत्ता, बस्तरचे महानिरीक्ष सुंदरराज यांची माहिती

दुसरीकडे, सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. बिजापूरमधील हल्ल्यात २२ जवान शहीद झाले आहेत. तर ३१ जवान जखमी आहेत. सर्व जखमी जवानांची प्रकृती स्थिर आहे. पण कोब्रा बटालियनचा एक १ जवान अद्याप बेपत्ता आहे, अशी माहिती बस्तरचे महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिली आहे.

नक्षलवाद्यांनी केलेल्या झाल्यानंतर बिजारपूरमध्ये उडालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले तर १६ जखमी झाल्याही माहिती आहे. याची पडताळणी केली जात आहे. आम्हाला एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेहही आढळून आला आहे, अशी माहिती सुंदरराज यांनी दिली.

२५-३० नक्षलवादी ठार, कुलदीप सिंह यांचा दावा

बिजापूरमध्ये इतक्या मोठ्या संख्येत जवान शहीद झाल्याने सुरक्षा दलांच्या मोहीमेचं आणि गुप्तचर विभागाचं हे मोठं अपयश असल्याचं बोललं जात आहे. मात्र सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मोहीमेत कुठल्याही धोक्याची कल्पना असती तर ती राबवली गेलीच नसती. यामुळे हे कुठल्याही प्रकारचे अपयश नाही. चकमकीत नक्षलवाद्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. तीन ट्रॅक्टर भरून त्यांचे मृतदेह आणि जखमींना घटनास्थळावरून नेण्यात आल्याची माहिती आहे. या चकमकीत किती नक्षलवादी ठार झाले याचा अचूनक आकडा देणं अवघड आहे. पण ही संख्या २५ ते ३० पेक्षा कमी नसेल, असं कुलदीप सिंह यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here