मुंबई : आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना एक महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआय एक मोठे पाऊल उचलणार आहे.

सध्याच्या घडीला देशामध्ये करोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत. या गोष्टीचा फटका आयपीएललाही बसला आहे. कारण आयपीएलशी निगडीत असलेल्या २० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता यावर उपाय करण्यासाठी बीसीसीआयने मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले असून खेळाडूंना करोनाची लस देण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत सध्याच्या घडीला बीसीसीआय आहे.

याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, ” सध्याच्या घडीला भारतामध्ये करोना व्हायरल वाढत आहे. पण त्याच्याबरोबरच आपल्याला पुढे जायचे आहे. त्यामुळे या गोष्टीवर जर काही उपाय काढायला असेल तर तो करोना लसीचा असू शकतो. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना करोनाची लस देण्यात यावी, या गोष्टीवर बीसीसीआय सध्याच्या घडीला विचार करत आहे. करोना व्हायरल कधी संपेल, हे कोणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे करोनाबाबत तुम्ही काहीच भाकीत वर्तवू शकत नाही. त्यामुळेच आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना करोनाची लस द्यायला हवी, यावर बीसीसीआय गंभीरपणे विचार करत आहे.”

सध्याच्या घडीला आयपीएलशी निगडीत २० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये आता दोन खेळाडूंचाही समावेश झालेला आहे. अक्षर पटेल आणि देवदत्त पडीक्कल हे करोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. त्याचबरोबर केकेआरच्या नितीष राणालाही करोना झाला होता, पण आता त्याची चाचणी झाली असून त्याचा अहवाल करोना निगेटीव्ह आला आहेत. त्याचबरोबर वानखेडे स्टेडियमवर काम करणाऱ्या १० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या गोष्टीचा मोठा फटका आयपीएलला बसू नये, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असून त्यादृष्टीने पावले उचलत आहेत. त्यामुळे आता आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना प्रथम करोना लस द्यावी, असा निर्णय बीसीसीआय लवकरच घेऊ शकते, असे म्हटले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here