वाचा:
दीपाली चव्हाण यांची मेळघाटात २०१४ पासून २०२१ पर्यंत सात वर्षांची सेवा झाली होती. त्यामुळे मेळघाटाबाहेर त्यांना बदली हवी होती. हरिसाल येथून परतवाडा किंवा अमरावती येथे बदली मिळावी यासाठी दीपाली चव्हाण यांचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने त्या निराश झाल्या होत्या. त्यातच बदलीसाठी त्रयस्थांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. त्यात महाविकास आघाडीतील एका महत्त्वाच्या नेत्याने त्यांच्याकडून पैसे घेतले. हे पैसे घेऊनही त्यांची बदली केली गेली नाही. त्यामुळे त्या खचून गेल्या होत्या. त्यांना नैराश्य आले होते. म्हणूनच त्यांनी कोणत्या नेत्याला पैसे दिले होते?, याचा तपास केला गेला पाहिजे व संबधितावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते यांनी केली आहे.
वाचा:
पैसे घेणारे रॅकेट सक्रिय: भाजप
मेळघाटातील वन कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी पैसे घेणारे रॅकेट सक्रिय होते का? जर असे रॅकेट खरंच सक्रिय असेल तर ते समोर आले पाहिजे, अशी मागणीही कुळकर्णी यांनी केली आहे. आमचे पैसे परत करा म्हणून दीपाली चव्हाण आणि तिचे पती कोणाकडे खेटे घालत होते? यांनी ज्या व्यक्तीला पैसे दिले त्या व्यक्तीचा चव्हाण कुटुंबावर दबाव होता का? असे अनेक मुद्दे शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केले आहेत. तसेच बदलीसाठी पैसे घेणारा हा इसम महाविकास आघाडीतील महत्त्वाचा नेता असल्याचा कुळकर्णी यांचा आरोप आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times