नांदेड : शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रथमच काँग्रेसची एकहाती सत्ता आली असून २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादित केले आहे. विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांशी लढणाऱ्या खासदार यांना मोठा धक्का बसला आहे. ( )

वाचा:

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया दोन एप्रिल रोजी पार पडली. या निवडणुकीत प्रथमच पालकमंत्री व भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मतदार यादीवरून कनिष्ठ न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद गेला होता. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचे बाळासाहेब रावणगावकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, तर भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर बिनविरोध विजयी झाले होते. रविवारी मतमोजणी झाल्यानंतर महाविकास आघाडीचे एकूण १७ उमेदवार विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी काँग्रेसचे बारा उमेदवार विजयी झाले आहेत. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात एक-दोन मताने उमेदवारांचा पराभव झाला. अर्धापूरमधून काँग्रेस जिल्हाध्यक्ष केवळ एका मताने विजयी झाले. नागेलीकर यांना १८, तर भाजपचे पवार यांना १७ मते मिळाली. चिखलीकर व त्यांचे सुपुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांचे सुपुत्र राजेंद्र केशवे आपापल्या मतदार संघातून विजयी झाले. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून काँग्रेसच्या सविता मुसळे यांनी भाजपच्या विद्यमान संचालक लक्ष्मण ठक्करवाड यांचा दारुण पराभव केला. मुसळे यांना ५६६, तर ठक्करवाड यांना ३१९ मते मिळाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनीही प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.

वाचा:

महाविकास आघाडीचे गोविंदराव शिंदे, बाबूराव कदम, वसंत चव्हाण, विजयसिंह देशमुख, श्याम कदम, नागेश पाटील, बाळासाहेब रावणगावकर, हणमंतराव पाटील, दिनकरराव दहिफळे, राजेंद्र केशवे, संगीता पावडे, विजयाबाई शिंदे, शिवराम लुटे, मोहनराव पाटील, सविता मुसळे, हरिहरराव भोसीकर व व्यंकटराव आळणे तर भाजप प्रणित आघाडीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, प्रविण पाटील चिखलीकर, नागेश पाटील आष्टीकर विजयी घोषित करण्यात आले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच काँग्रेसने विशेष लक्ष घालून एकहाती सत्ता मिळवली. गेल्या अनेक वर्षांपासून बँकेची सूत्रे काँग्रेसेतर नेत्यांकडे होती. बँकेच्या निवडणुकीचा निकाल खासदार चिखलीकर यांना धक्का देणारा मानला जातो.

‘ निवडणुकीत २१ पैकी १७ जागांवर कौल देत मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व नवनिर्वाचित संचालक प्रयत्नशील राहतील, याची मला खात्री आहे’, असा विश्वास या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून बँकेत मनमानी सुरू आहे. बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यंदा निवडणूक लढवण्यात आली. मतदारांनी चव्हाण यांच्यावर विश्वास टाकून घवघवीत यश दिले. बँकेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवनिर्वाचित संचालक प्रयत्न करतील – अमर राजूरकर, महानगराध्यक्ष, काँग्रेस

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here