भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी मुख्यमंत्री ठाकरे यांना उद्देशून टीका केली होती. मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही. ते अपघाताने मुख्यमंत्री बनले आहेत, असं पाटील म्हणाले होते. त्या टीकेला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी उत्तर दिले.
वाचा:
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘भाजपची अवस्था ही पाण्याबाहेर असलेल्या माशासारखी झाली आहे. सत्तेविना भाजपची मंडळी तडफडत आहेत. शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरुन भाजपचे महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले होते याचे त्यांनी स्मरण ठेवावे. प्रबोधनकार ठाकरे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समाजकारण, राजकारणाचे बाळकडू मिळाले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे व राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. दरम्यान सत्तेवर असताना भाजपच्या नेत्यांनी काय कर्तृत्व दाखविले हे राज्यातील जनता चांगलीच ओळखून आहे. चंद्रकांत पाटील हे राज्यातील दोन नंबरचे मंत्री होते. त्यांच्या मंत्रीपदाच्या कालावधीत कोल्हापूरचा शून्य टक्के विकास झाला.’
पत्रकार परिषदेला शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, देवस्थान समिती सदस्य शिवाजी जाधव, मंजित माने आदी उपस्थित होते.
मोदी, शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर टीका
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले,‘महाराष्ट्रात भाजप वगळून सरकार स्थापन झाल्यामुळे केंद्र सरकारला शिवसेनेविषयी पोटशूळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना खूश करण्यासाठी भाजपचे नेते फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पाटील हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करतात.भानामती झाल्यासारखी ही मंडळी काय वाटेल ते बोलत आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते असली वक्तव्ये सहन करणार नाहीत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times