सोमय्या औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काय विचार आहे?, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना ते शुद्ध असल्याचे सर्टिफिकेट दिले होते. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आता संजय राठोड आणि अनिल देशमुख गेल्यानंतर आता मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जाणार असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
तत्कालिन राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी किरिट सोमय्यांनी केली होती. त्यानंतर अनिल देखमुखांवर खंडणीचा खळबळजनक आरोप झाल्यानंतर त्यांनी देशमुख यांच्यावरही राजीनाम्याची मागणी करत टीकेची झोड उठवली होती.
क्लिक करा आणि वाचा-
महाविकास आघाडीचा वसुलीचा धंदा बाहेर येईल- सोमय्या
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडीबाबत गंभीर वक्तव्य केले आहे. महाविकास अघाडीचा ‘वसुलीचा धंदा’ असा उल्लेख सोयमय्या यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. महाविकास आघाडीचा वसुलीचा धंदा आता पूर्णपणे बाहेर येईल. आता दोन मंत्री तर गेलेच आहेत, आता पुढे आणखी ४ मंत्री बाहेर जाणार आहेत, असे सोमय्या म्हणाले. या वेळी त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री यांचे थेट नाव घेतले. आणि आणखी तीन मंत्र्यांची नावे त्यांनी घेतलेली नाहीत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times