नागपूरः महाराष्ट्रात करोना विषाणुच्या संसर्गानं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवसे नवीन बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. मुंबई, पुण्याबरोबरच नागपुरातही करोनाचा कहर वाढत आहे. आज नागपुरात ३ हजार ५१९ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, गेल्या २४ तासांत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने रुग्णवाढ नोंदवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात दररोज तीन ते साडेतीन हजारांच्या घरातच करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात ३ हजार५१९ रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २ लाख ४५ हजार १२५ इतकी झाली आहे.

आज दिवसभरात ३ हजार ७०३ बाधित रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१. ०२ टक्के इतके आहे.

जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१ हजार १३० इतकी झाली आहे. इतकेच नव्हे तर मृत्यूचे प्रमाणही वाढले असून हा आकडाही आता साडेपाच हजारांच्या जवळ पोहोचला आहे. आज जिल्ह्यात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात शहर भागातील ३३ व ग्रामीणमधील मृत्यूची संख्या१९ , तर जिल्ह्याबाहेरील पाच रुग्णांच्या मृत्यूचा समावेश आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here